This is the official account of Pune City Police. Not monitored 24/7. For any emergency, Dial 112.

Pune, Maharashtra
अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा! गणरायाच्या आशीर्वादाने सर्वांचे आयुष्य सुखसमृध्दीने भरून जावो, हीच सदिच्छा! #अनंत_चतुर्दशी_२०२६
8
3,239
गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान ध्वनी प्रदूषणासंदर्भात तक्रार आहे? आपल्या परिसरातील संबंधित नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क साधा. शांततेत विसर्जन… पर्यावरणाचे रक्षण! नागरिकांच्या सहकार्याने ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण. #PunePoliceUpdates #GaneshVisarjan2026 #PuneCityPolice
8
18
56
24,778
दि. २५ सप्टेंबर २०२६ रोजी पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान मिरवणूक मार्गावरील प्रमुख रस्ते बंद राहणार असून वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. ट्रॅफिक कोंडीत अडकण्यापेक्षा पर्यायी रिंग रोड वापरा आणि आपला प्रवास सुखकर करा! #PunePoliceUpdates
6
16
48
15,900
दि. २५ सप्टेंबर २०२६ रोजी पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान मिरवणूक मार्गावरील प्रमुख रस्ते बंद राहणार असून वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. ट्रॅफिक कोंडीत अडकण्यापेक्षा पर्यायी रिंग रोड वापरा आणि आपला प्रवास सुखकर करा! #PunePoliceUpdates
2
36
141
32,508
पुण्यातील भव्य गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सोयीसाठी आणि सुरक्षित प्रवासासाठी विशेष ऑनलाईन सुविधा! एकाच ठिकाणी मिळवा वाहतूक आणि मिरवणूक मार्गांची अद्ययावत माहिती. diversion.punepolice.gov.in #PunePoliceUpdates
2
7
25
16,855
पुणेकरांनो! गणेश विसर्जन मिरवणूक सुरू झाल्यानंतर शहरातील प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद केले जातात. या बंद रस्त्यांऐवजी शहरात प्रवास करण्यासाठी पुणे पोलिसांतर्फे डायव्हर्शन पॉईंट्स आणि रिंग रोडचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.  नागरिकांनी कृपया नोंद घ्यावी. #PunePoliceUpdates
2
5
8
5,805
पुणेकरांनो, गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान शहरातील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी २४ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ११ वाजल्यापासून मुख्य मिरवणूक संपेपर्यंत खालील प्रमुख रस्त्यांवर सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नो-पार्किंग घोषित करण्यात आले आहे. नागरिकांनी कृपया नोंद घ्यावी. #PunePoliceUpdates
1
6
10
8,833
गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे वाहतूक पोलिसांकडून धायरी फाटा, केशवनगर-मुंढवा आणि ससाणेनगर-हडपसर परिसरातील वाहतुकीत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.  प्रवासाला निघण्यापूर्वी खालील रस्ते बदल व पर्यायी मार्गांची माहिती घ्यावी ही विनंती. #PunePoliceUpdates
5
10
24
40,585
गणेश विसर्जन मिरवणूक सुरक्षित आणि शिस्तबद्ध पार पडण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी २५ व २६ सप्टेंबर दरम्यान शहरातील मुख्य रस्त्यांवर बदल आणि रस्ते बंद ठेवण्याचे नियोजन केले आहे.  आपल्या प्रवासाचे नियोजन करण्यापूर्वी खालील प्रमुख बंद रस्ते व वेळांची माहिती घ्या. #PunePoliceUpdates
1
5
9
16,333
पुणेकरांसाठी महत्त्वाचे! गणेशोत्सव व गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शहरात ट्रॅफिकची कोंडी टाळण्यासाठी पुढील पार्किंगची ठिकाणे उपलब्ध करण्यात आली आहेत.  नागरिकांनी आपली वाहने रस्त्यावर अस्ताव्यस्त पार्क न करता ठरवून दिलेल्या ठिकाणीच पार्क करावीत ही विनंती. #PunePoliceUpdates
2
3
7
3,492
संयम ठेवा, नशेला दूर करा! निरोगी जीवनशैली स्वीकारा आणि यशाच्या वाटेवर पुढे चला. #LiveHealthy⁠ ⁠#BigDreams⁠ ⁠#HealthyLiving⁠ ⁠#NoAddiction⁠ ⁠#PunePolice⁠
3
2
15
4,212
गेमिंग कमी, खेळ वाढवा! नशा आणि स्क्रीनपासून लांब राहा, मैदानावर उतरा. #SayNoToDrugs⁠ ⁠#SayNoToPhone⁠ ⁠#ActiveLifestyle⁠ ⁠#SanyamInitia
7
2
10
17,357
मोबाईल आणि स्क्रीनचा अतिवापर मुलांचे बालपण, त्यांची सर्जनशीलता आणि प्रत्यक्ष आयुष्यातील आनंद हिरावून घेत आहे. स्क्रीन टाईम कमी करून मुलांना मैदानी खेळ, वाचन, संगीत आणि निसर्गाच्या सानिध्यात रमू देणे त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत गरजेचे आहे. #DigitalDetox #ScreenTimeLimit
4
7
5,025
गणेशोत्सव काळात दुकानांमध्ये मालाची लोडिंग-अनलोडिंगसाठी विशेष वेळ गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील मध्यवर्ती भागात होणारी गर्दी आणि वाहतूक कोंडी लक्षात घेऊन दुकानांमध्ये मालाची ने-आण करण्यासाठी वेळ निश्चित करण्यात आली आहे.
3
3
7
8,639
सर्व नागरिकांना गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा. गणरायाच्या आगमनाने सर्वत्र आनंद, उत्साह आणि मंगलमय वातावरण नांदो, हीच सदिच्छा! #गणेश_चतुर्थी_२०२६
6
1
29
3,424
दुचाकी चोरीच्या तपासादरम्यान विश्रामबाग पोलीस ठाणे, तपास पथकाने विधिसंघर्षित बालक व त्याच्या साथीदाराचा शोध घेत पुणे व इतर जिल्ह्यांतून चोरी केलेल्या १४ मोटारसायकली हस्तगत करून १२ गुन्ह्यांची उकल केली. यामध्ये सुमारे ₹१० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. #PunePolice
3
9
6,610
दि. ११ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ५ वाजल्यापासून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळासमोर आयोजित अथर्वशीर्ष पठण कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर काही मार्गांवरील वाहतूक आवश्यकतेनुसार वळविण्यात येणार आहे. श्रद्धेचा उत्सव… वाहतुकीची शिस्तही महत्त्वाची! #PuneTrafficUpdates #Atharvashirsha
3
1
7
6,670
गणपती बाप्पांच्या मूर्ती खरेदी व प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर दि. १२, १३ व १४ सप्टेंबर २०२६ रोजी काही प्रमुख मार्गांवर वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. बाप्पांचे स्वागत करूया, वाहतूक शिस्तही जपूया! #PuneTraffic #Ganeshotsav #TrafficUpdate
3
5
9,590
गणेशोत्सव काळात मध्यवर्ती पुण्यात जड वाहनांना प्रवेशबंदी! दि. १२ सप्टेंबरपासून गणपती विसर्जनापर्यंत शहरातील प्रमुख मार्गांवर जड/अवजड वाहनांच्या वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे. #PuneTrafficUpdates
1
4
5
3,175
समर्थ पोलीस ठाणे हद्दीत दाखल झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा कौशल्यपूर्ण तपास करत सराईत आरोपींना अटक करण्यात आली. तसेच सदर प्रकरणात सोने, चांदी व मोत्यांचे दागिने असा सुमारे ₹५२ लाखांचा चोरीचा मुद्देमाल मूळ तक्रारदारांना परत करण्यात आला. #PunePolice
4
1
14
3,955