दसरा मेळावा, शिवतीर्थ आणि शिवसैनिक हे एक अतूट नाते आहे ! 🚩
दसरा मेळावा म्हणजे केवळ एक मेळावा नाही, तर तो आहे शिवसेनेच्या निष्ठेचा, भगव्या विचारांचा आणि शिवसैनिकांच्या एकजुटीचा उत्सव आहे !
दरवर्षी दसरा मेळाव्याच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवतीर्थावर एकवटलेल्या निष्ठावंत शिवसैनिकांची भेट होते. जुन्या आठवणींना उजाळा मिळतो, नव्या संकल्पांना बळ मिळतं आणि शिवसेनेच्या विचारांसाठी अधिक जोमाने काम करण्याची नवी ऊर्जा मिळते.