सातारा जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी ना. मकरंद आबांचा दिलासादायक निर्णय !
मदत व पुनर्वसन विभागाच्या अध्यादेशानुसार सातारा जिल्ह्यातील सर्व 11 तालुक्यांचाही दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.
@makrandpatil99#MakrandPatil#दुष्काळ#महाराष्ट्र
📍 मुंबई | दुष्काळ निवारण उपसमिती बैठक व जनसंवाद
राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा घेत दुष्काळ निवारणासाठी आवश्यक उपाययोजना, शेतकरी बांधवांना दिलासा आणि दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना मदत मिळवून देण्याबाबत उपसमितीच्या बैठकीत चर्चा केली.
शेतकऱ्यांना दिलासा, संकटावर मात करण्यासाठी शासन कटिबद्ध !
खरीप हंगाम २०२६ अंतर्गत राज्यातील ३०४ तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले आहेत. दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी शासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.
शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना आवश्यक मदत व दिलासा देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. संकटाच्या या काळात शेतकऱ्यांना शक्य तितकी मदत मिळवून देणे, हेच आमचे प्राधान्य!
शेतकरी हित सर्वतोपरी!
#दुष्काळनिवारण#शेतकरीहित#महाराष्ट्रशासन#मकरंदआबापाटील#मदतवपुनर्वसन
📍 मुंबई | केंद्रीय पथकासोबत दुष्काळी परिस्थितीचा आढावा...
राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय पथकासोबत आयोजित आढावा बैठकीस उपस्थित होतो.
यावेळी महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळावी, यासाठी सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच या मदतीचा केंद्रबिंदू सर्वसामान्य शेतकरी आणि शेतमजूर असावा, त्यांच्या अडचणींना प्राधान्य मिळावे आणि त्यांना दिलासा मिळावा, याबाबत भूमिका मांडण्यात आली.
#दुष्काळ
📍सातारा / 🗓️ 10 ऑक्टोबर 2026
सातारा येथील निवासस्थानी जनता दरबार दरम्यान लोकांच्या भेटीगाठी घेऊन समस्या आणि अडचणी जाणून घेतल्या.
संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून नागरिकांच्या समस्या, अडचणी तात्काळ सोडवण्यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
#जनतादरबार#MakrandPatil
नव्या गळीत हंगामाची मंगलमय सुरुवात!
किसन वीर–खंडाळा सहकारी साखर उद्योग लि., खंडाळा–म्हावशी यांच्या सन २०२६–२७ च्या गळीत हंगामाचा शुभारंभ आज उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
शेतकऱ्यांचा विश्वास, कामगारांची मेहनत आणि सहकाराची ताकद घेऊन नव्या हंगामाच्या यशस्वी वाटचालीस शुभारंभ.!
दुष्काळजन्य परिस्थितीचा आढावा… जनतेशी थेट संवाद !
अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळजन्य परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत आवश्यक उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा केली.
सहकारातून विकासाची नवी दिशा…!
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., सातारा संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक २०२६–३१ करिता महायुतीच्या खरेदी-विक्री संघातून माझा अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला.
#सहकार#सातारा_जिल्हा_बँक#उमेदवारीअर्ज#ग्रामीणविकास#सातारा
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., सातारा संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक २०२६–३१ करिता महायुतीच्या सोसायटी मतदारसंघातून आज माझा अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला.
सातारा जिल्ह्याच्या सामाजिक आणि आर्थिक जडणघडणीत सहकार चळवळीचे योगदान मोठे आहे.
#साताराजिल्हामध्यवर्तीबँक#DCC
🗓️ २९ सप्टेंबर २०२६ | 📍 मंत्रालय
अपुऱ्या पावसामुळे राज्यातील विविध भागांत निर्माण झालेल्या दुष्काळजन्य परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक दुष्काळ निवारण उपसमितीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
राज्यातील पाणीटंचाई, पीक नुकसान, चाऱ्याची उपलब्धता तसेच दुष्काळग्रस्त भागातील नागरिक आणि शेतकरी बांधवांना आवश्यक मदत याबाबत यावेळी सविस्तर आढावा घेण्यात आला. धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीबाबतही आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.
राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील परिस्थिती लक्षात घेऊन नागरिक आणि शेतकरी बांधवांना आवश्यक ती मदत वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने प्रभावीपणे कार्यवाही करण्यावर बैठकीत भर देण्यात आला.
यावेळी पर्यावरण मंत्री सौ. पंकजा मुंडे, ग्रामविकास मंत्री श्री. जयकुमार गोरे, पाणीपुरवठा मंत्री श्री. गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री श्री. मकरंद पाटील, सहकार मंत्री श्री. बाबासाहेब पाटील यांच्यासह मुख्य सचिव श्री. राजेश अग्रवाल आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
@cbawankule@Pankajamunde@Jaykumar_Gore@GulabraoRPatil@makrandpatil99@babasahebpati1#PratapSarnaik#TransportMinister#Dharashiv#DroughtRelief#Maharashtra
दुष्काळजन्य परिस्थितीवर उपाययोजना सुचविण्याबाबत मंत्रिमंडळ उपसमितीची पहिली बैठक महसूल मंत्री मा.श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली.
अपुऱ्या पावसामुळे राज्यातील विविध भागांत निर्माण झालेल्या दुष्काळजन्य परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक उपाययोजना सुचविण्यासाठी राज्यातील पाणीटंचाई, पीक नुकसान, चारा उपलब्धता तसेच दुष्काळग्रस्त भागातील नागरिक व शेतकरी बांधवांना आवश्यक मदत याबाबत यावेळी सविस्तर आढावा घेऊन उपाययोजनांबाबत चर्चा झाली.
या बैठकीस महसूलमंत्री मा. @cbawankule, ग्रामविकास मंत्री मा. @Jaykumar_Gore, पाणीपुरवठा मंत्री मा. @GulabraoRPatil, परिवहन मंत्री मा. @PratapSarnaik, मदत व पुनर्वसन मंत्री मा. @makrandpatil99, सहकार मंत्री मा.@babasahebpati1 तसेच राज्याचे मुख्य सचिव मा. राजेश अग्रवाल आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
@Dev_Fadnavis@PMOIndia@CMOMaharashtra@MahaDGIPR#Maharashtra#Mumbai#FarmersFirst
सन २०२६ च्या खरीप हंगामातील पर्जन्यमानातील तूट व अन्य घटकांचा विचार करून राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर केली आहे.
Trigger-1 लागू झालेल्या या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याची कार्यवाही तात्काळ सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
सर्वेक्षण केलेल्या क्षेत्रातील पिकांची स्थिती, छायाचित्रे व GPS कोऑर्डिनेटसह अहवाल तातडीने शासनास सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
शेतकरी बांधवांना आवश्यक त्या विविध उपाययोजना व सवलती लागू करण्यासाठी महायुती शासन कटिबद्ध!
#महायुतीशासन#दुष्काळ#शेतकरीहित#खरीप2026
📍 बुलढाणा जिल्हा...
पालकमंत्री म्हणून शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून दुष्काळसदृश्य परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली.
पिकांची स्थिती, पाण्याची उपलब्धता आणि शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत आवश्यक उपाययोजनांसाठी प्रशासनाला स्पष्ट सूचना दिल्या.
#शेतकरीहित#दुष्काळ#महाराष्ट्र
📍 खडकपूर्णा प्रकल्प, बुलढाणा...
दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर खडकपूर्णा प्रकल्पाची पाहणी करून पाणीपातळी, जलसाठा व पाणी नियोजनाचा आढावा घेतला.
शेतकरी हितासाठी आवश्यक उपाययोजनांना प्राधान्य !
#बुलढाणा#खडकपूर्णा#शेतकरीहित#दुष्काळसदृशपरिस्थिती#जलव्यवस्थापन