Dy. Chief Minister, Maharashtra | Minister of Urban Development, Housing & Public Works (Public Ent.)

Maharashtra, India
सातासमुद्रापार महाराष्ट्राचा जयजयकार...🚩लंडन दौऱ्यातील खास क्षण!
72
334
412
53,546
भारतीय लष्करातील गुलवीर सिंगचे कौतुकास्पद रौप्य यश... आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारतीय धावपटू गुलवीर सिंगने पुरुषांच्या १०००० मीटर धावण्याच्या शर्यतीत नेत्रदीपक कामगिरी बजावत २८ मिनिटे २९.३८ सेकंद अशी वेळ नोंदवत रौप्यपदक पटकावले आहे. मागच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत देखील गुलवीरने कांस्यपदक पटकावले होते. गुलवीरच्या या देदीप्यमान कामगिरीबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा. #AsianGames2026 #India #Athletics #SilverMedal #Cheer4Bharat
1
11
13
2,136
भारताला पोल व्हॉल्टमध्ये ऐतिहासिक पदक... आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये ऍथलेटिक्स मधील पोल व्हॉल्ट विभागात भारताची पहिली आशियाई क्रीडा पदक विजेती म्हणून बारानिका एलंगोवनने इतिहास रचला. बारानिका एलंगोवनने ४.१५ मीटर उंची पार करून कांस्य पदक पटकावले. पोल व्हॉल्टमधील भारताचे हे पहिले आशियाई क्रीडा पदक आहे. बारानिका एलंगोवनच्या ऐतिहासिक कामगिरीबद्दल तमाम भारतीयांना सार्थ अभिमान आहे. तुझे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. #AsianGames2026 #India #Athletics #poleVault #BronzeMedal #Cheer4Bharat
2
19
22
2,583
📍 टेंभी नाका, ठाणे श्री - भू- दुर्गात्मिकायै नमः श्री जय अंबे माँ सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या देवीचे मंडप पूजन!
5
23
28
2,648
📍 #ठाणे | निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी... चुकले आमचे काही क्षमा असावी... ठाण्यातील किसन नगर येथील जनजागृती सार्वजनिक गणेशोस्तव मंडळ आणि किसन नगर नंबर -२ सार्वजनिक गणेशोस्तव मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या श्री गणेशाची उत्तरपूजा आज संपन्न झाली. यावेळी गणपती बाप्पाची भक्तीभावाने आरती करण्यात आली. श्री गणेशाचे आशीर्वाद सदैव सोबत रहावे, सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, भरभराट, आनंद यावा तसेच सर्वांच्या दुःख, अडचणी, चिंता दूर व्हाव्यात. काही चुकले माकले असल्यास देवा गजाननाने क्षमा करावी असे सांगत साश्रू नयनांनी त्याला निरोप दिला. यावेळी शिवसेनेच्या वतीने बाळगोपाळांना मोफत वडा पाव वाटप करण्यात येते. या वडा पाव स्टॉलला भेट देऊन सर्वांना वडा पावचे वाटप केले. यावेळी मंडळाचे कार्याध्यक्ष ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे, नगरसेवक प्रकाश शिंदे, विभागप्रमुख सुनील मोरे तसेच #शिवसेना लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, शिवसैनिक, मंडळाचे कार्यकर्ते व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. #Shivsena #Thane #गणपती #बाप्पा #मोरया #गणेशोत्सव२०२६ #Ganeshotsav2026 #EknathShinde #Maharashtra
11
67
73
5,480
टेबल टेनिस मध्ये सुद्धा फडकला तिरंगा... मनुष शाह, दिया चितळे यांनी मिश्र दुहेरी टेबल टेनिसमध्ये पटकावले कांस्यपदक... आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये मनुष शाह, दिया चितळे या भारतीय जोडीने मिश्र दुहेरी टेबल टेनिसमध्ये कांस्यपदकावर आपली मोहोर उमटवली आहे. मनुष शाह, दिया चितळे यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि टेबल टेनिस खेळातील भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. #AsianGames2026 #India #TebalTennis #BronzeMedal #Cheer4Bharat
11
83
95
3,508
ऍथलेटिक्स मध्ये भारताचा पदकाचा श्रीगणेशा... भारताच्या मनप्रीत कौरने २०२६ आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या गोळाफेक प्रकारात १७.१७ मीटरच्या सर्वोत्तम फेकीसह कांस्य पदक पटकावले. मनप्रीत कौरचे मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा. #AsianGames2026 #India #Athletics #Shotput #BronzeMedal #Cheer4Bharat
14
82
94
3,384
📍 सिंहगड, #पुणे | गणेशोत्सवानिमित्त आज ज्येष्ठ अभिनेते आणि नाम फाउंडेशनचे सर्वेसर्वा नाना पाटेकर यांच्या पुण्यातील सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याजवळ असलेल्या नानाच्या वाडीला भेट देऊन तिथे विराजमान झालेल्या श्री गणेशाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि त्यावर करायच्या विविध उपाययोजना तसेच शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी नाम फाऊंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमातून काय काय करता येणे शक्य आहे याबाबत आमची सविस्तर चर्चा झाली. यावेळी नाना यांचा मुलगा मल्हार पाटेकर, पत्नी नीलकांती पाटेकर तसेच पाटेकर कुटुंबातील अन्य सदस्य तसेच आजूबाजूचे ग्रामस्थ, नानांचे आणि माझे सहकारी उपस्थित होते. #NanaPatekar #Pune #गणपती #बाप्पा #मोरया #गणेशोत्सव२०२६ #Ganeshotsav2026 #EknathShinde #Maharashtra @nanagpatekar
19
106
230
12,017
Eknath Shinde Live । किसन नगर, ठाणे जनजागृती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ - श्री गणेशाची पूजा व आरती - लाईव्ह nitter.net/i/broadcasts/1yKAPwQoZ…
17
101
108
7,391
Eknath Shinde Live । किसन नगर, ठाणे जनजागृती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ - श्री गणेशाची पूजा व आरती - लाईव्ह nitter.net/i/broadcasts/1yKAPwQoZ…
14
101
111
4,005
📍 #ठाणे | सिंहवाहिनी, आदिशक्ती तू, विश्वाची माऊली... तुझ्या कृपेची आम्हावरी लाभो सदा सावली... वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या प्रेरणेने आणि आशीर्वादाने सुरू करण्यात आलेल्या ठाण्यातील टेंभीनाका येथील 'श्री जय अंबे माँ सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळा'च्या देवीचा मंडप पूजन सोहळा आज मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. यंदा मंडळाचे हे ४८वे वर्ष असून यंदा देवीसाठी देवभूमी उत्तराखंड येथील श्री बद्रीनाथ मंदिराची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे. आज मंडप पूजन सोहळा पार पडल्यानंतर देवीच्या भव्य मंडपाच्या उभारणीला सुरुवात होणार आहे. यावेळी खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, आमदार रवींद्र फाटक, शहरप्रमुख हेमंत पवार, महापौर शर्मिला पिंपळोलकर, उपमहापौर कृष्णा पाटील, गटनेते पवन कदम, नगरसेवक संजय वाघुले, राजेश मोरे, सुधीर कोकाटे, शिवसेना राज्य संघटन प्रमुख आनंद परांजपे, ठाणे जिल्हा महिला संघटिका सौ.मीनाक्षी शिंदे, नौपाडा प्रभाग समिती सभापती सौ.मीनल संख्ये, माजी परिवहन समिती सभापती विलास जोशी, कमलेश चव्हाण, निखिल बुडजडे, जॅकी भोईर, स्वानंद पवार, किरण नाकती, बाळा गवस शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे तसेच #शिवसेना लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, शिवसैनिक आणि भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. #Shivsena #Thane #नवरात्र #नवरात्रोत्सव #Navratri #EknathShinde #Maharashtra
21
113
142
5,998
Eknath Shinde Live | टेंभी नाका, ठाणे श्री जय अंबे माँ सार्वजनिक नवरात्रोत्सव - देवीचा मंडप पूजन सोहळा - लाईव्ह nitter.net/i/broadcasts/1vJpPNWbY…
22
147
160
4,804
भारतीय नेमबाजी संघाने पटकावले अजून एक रौप्यपदक.. आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मधील नेमबाजी खेळातील ५० मीटर रायफल थ्री पोजिशन या प्रकारात रुद्रांक्ष पाटील, ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर आणि नीरज कुमार या भारतीय नेमबाजी चमूने रौप्यपदकावर आपली मोहोर उमटवली आहे. अत्यंत अटीतटीच्या लढतीत भारतीय संघाला अगदी थोड्या फरकाने सुवर्णपदकाने हुलकावणी दिली. रुद्रांक्ष पाटील, ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर आणि नीरज कुमार या भारतीय नेमबाजांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि नेमबाजी खेळातील भावी कारकिर्दीसाठी हार्दिक शुभेच्छा. #AsianGames2026 #India #Shooting #SilverMedal #Cheer4Bharat
29
159
168
4,319
भारताच्या खात्यात अजून एक सुवर्णपदक... कमलजीत, सुरुची इंदर सिंग यांनी १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात सुवर्णपदकावर उमटवली मोहोर... आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मधील नेमबाजी खेळातील १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात कमलजीत, सुरुची इंदर सिंग या जोडीने उत्तम एकाग्रता, जिद्द आणि चिकाटी दाखवून सुवर्णपदक पटकावले आहे. महिला क्रिकेट नंतर भारतासाठी हे दुसरे सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम कमलजीत, सुरुची इंदर सिंग यांनी केला. नेत्रदीपक कामगिरी बजावणाऱ्या कमलजीत, सुरुची इंदर सिंग या नेमबाज जोडीचा तमाम देशवासीयांना अभिमान आहे. आपले मनःपूर्वक अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा. #AsianGames2026 #India #Shooting #GoldMedal #Cheer4Bharat
27
163
177
4,304
अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष, माथाडी कामगारांच्या सर्वांगीण विकासासाठी आयुष्यभर झटणारे झुंझार नेते अण्णासाहेब पाटील यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन. #AnnasahebPatil #MathadiKamgar #Maharashtra
28
157
165
8,124