Dy. Chief Minister, Maharashtra | Minister of Urban Development, Housing & Public Works (Public Ent.)

Maharashtra, India
Filter
Exclude
Time range
-
Minimum likes
📍 #मुंबई | अनंत चतुर्दशीनिमित्त मुंबईतील गिरगाव चौपाटी येथे डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या निर्माल्य संकलन उपक्रमाला भेट देऊन त्यांचे विशेष कौतुक केले. डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने मुंबईतील गिरगाव आणि जुहू चौपाटी येथे गणेश मंडळ तसेच घरगुती गणेश मूर्तीवरील निर्माल्य गोळा करून त्यापासून खत निर्मिती केली जाते. यंदाही या उपक्रमात अनेक श्री साधक स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते. या सर्वांना भेटून पर्यावरण रक्षणासाठी हातभार लावणाऱ्या या उपक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्व श्री साधकांचे विशेष कौतुक केले. यावेळी खासदार मिलिंद देवरा आणि या उपक्रमात दरवर्षी सहभागी होणारे श्री साधक राजन कारखानीस आणि इतर हजारो सहकारी उपस्थित होते. #Shivsena #Mumbai #गणपती #बाप्पा #मोरया #गणेशोत्सव२०२६ #Ganeshotsav2026 #EknathShinde #Maharashtra @Shivsenaofc @milinddeora
5
37
42
3,120
📍 मुंबई | गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या... अनंत चतुर्दशीनिमित्त मुंबईतील गिरगाव चौपाटी येथे मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पुष्पवृष्टी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपस्थित राहून मुंबईतील वेगवेगळ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतींना जड अंतःकरणाने निरोप दिला. मुंबईतील यंदाचा गणेशोत्सव अतिशय निर्विघ्नपणे कोणताही अनुचित प्रकार न घडता पार पडत असल्याबद्दल समस्त गणेशोत्सव मंडळे, पोलीस, मुंबई मनपा अधिकारी कर्मचारी यांचे विशेषत्वाने अभिनंदन केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री मंगलप्रभात लोढा, भाजप मुंबई अध्यक्ष व आमदार अमित साटम, खासदार मिलिंद देवरा, मुंबईच्या महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती, मुंबई मनपा आयुक्त अश्विनी भिडे आणि इतर अधिकारी उपस्थित होते. #अनंतचतुर्दशी #Mumbai #गणपती_बाप्पा_मोरया #Ganeshotsav2026 #EknathShinde @Dev_Fadnavis @MPLodha @milinddeora
6
47
56
4,928
पुढच्या वर्षी लवकर या! किसन नगर जनजागृती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाची उत्तरपूजा.
22
114
158
5,589
Eknath Shinde Live | मुंबई श्री गणेश विसर्जन मिरवणुक - भव्य पुष्पवृष्टी सोहळा - लाईव्ह nitter.net/i/broadcasts/1XGygwYOn…
28
143
162
8,429
Eknath Shinde Live | मुंबई श्री गणेश विसर्जन मिरवणुक - भव्य पुष्पवृष्टी सोहळा - लाईव्ह nitter.net/i/broadcasts/1XGygwYOn…
19
133
139
4,598
भारतीय लष्करातील गुलवीर सिंगचे कौतुकास्पद रौप्य यश... आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारतीय धावपटू गुलवीर सिंगने पुरुषांच्या १०००० मीटर धावण्याच्या शर्यतीत नेत्रदीपक कामगिरी बजावत २८ मिनिटे २९.३८ सेकंद अशी वेळ नोंदवत रौप्यपदक पटकावले आहे. मागच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत देखील गुलवीरने कांस्यपदक पटकावले होते. गुलवीरच्या या देदीप्यमान कामगिरीबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा. #AsianGames2026 #India #Athletics #SilverMedal #Cheer4Bharat
23
157
172
4,162
भारताला पोल व्हॉल्टमध्ये ऐतिहासिक पदक... आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये ऍथलेटिक्स मधील पोल व्हॉल्ट विभागात भारताची पहिली आशियाई क्रीडा पदक विजेती म्हणून बारानिका एलंगोवनने इतिहास रचला. बारानिका एलंगोवनने ४.१५ मीटर उंची पार करून कांस्य पदक पटकावले. पोल व्हॉल्टमधील भारताचे हे पहिले आशियाई क्रीडा पदक आहे. बारानिका एलंगोवनच्या ऐतिहासिक कामगिरीबद्दल तमाम भारतीयांना सार्थ अभिमान आहे. तुझे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. #AsianGames2026 #India #Athletics #poleVault #BronzeMedal #Cheer4Bharat
21
154
159
3,891
📍 टेंभी नाका, ठाणे श्री - भू- दुर्गात्मिकायै नमः श्री जय अंबे माँ सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या देवीचे मंडप पूजन!
27
164
232
7,031
📍 #ठाणे | निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी... चुकले आमचे काही क्षमा असावी... ठाण्यातील किसन नगर येथील जनजागृती सार्वजनिक गणेशोस्तव मंडळ आणि किसन नगर नंबर -२ सार्वजनिक गणेशोस्तव मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या श्री गणेशाची उत्तरपूजा आज संपन्न झाली. यावेळी गणपती बाप्पाची भक्तीभावाने आरती करण्यात आली. श्री गणेशाचे आशीर्वाद सदैव सोबत रहावे, सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, भरभराट, आनंद यावा तसेच सर्वांच्या दुःख, अडचणी, चिंता दूर व्हाव्यात. काही चुकले माकले असल्यास देवा गजाननाने क्षमा करावी असे सांगत साश्रू नयनांनी त्याला निरोप दिला. यावेळी शिवसेनेच्या वतीने बाळगोपाळांना मोफत वडा पाव वाटप करण्यात येते. या वडा पाव स्टॉलला भेट देऊन सर्वांना वडा पावचे वाटप केले. यावेळी मंडळाचे कार्याध्यक्ष ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे, नगरसेवक प्रकाश शिंदे, विभागप्रमुख सुनील मोरे तसेच #शिवसेना लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, शिवसैनिक, मंडळाचे कार्यकर्ते व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. #Shivsena #Thane #गणपती #बाप्पा #मोरया #गणेशोत्सव२०२६ #Ganeshotsav2026 #EknathShinde #Maharashtra
26
164
178
7,146
टेबल टेनिस मध्ये सुद्धा फडकला तिरंगा... मनुष शाह, दिया चितळे यांनी मिश्र दुहेरी टेबल टेनिसमध्ये पटकावले कांस्यपदक... आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये मनुष शाह, दिया चितळे या भारतीय जोडीने मिश्र दुहेरी टेबल टेनिसमध्ये कांस्यपदकावर आपली मोहोर उमटवली आहे. मनुष शाह, दिया चितळे यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि टेबल टेनिस खेळातील भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. #AsianGames2026 #India #TebalTennis #BronzeMedal #Cheer4Bharat
23
174
219
4,934
ऍथलेटिक्स मध्ये भारताचा पदकाचा श्रीगणेशा... भारताच्या मनप्रीत कौरने २०२६ आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या गोळाफेक प्रकारात १७.१७ मीटरच्या सर्वोत्तम फेकीसह कांस्य पदक पटकावले. मनप्रीत कौरचे मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा. #AsianGames2026 #India #Athletics #Shotput #BronzeMedal #Cheer4Bharat
26
170
185
4,318
📍 सिंहगड, #पुणे | गणेशोत्सवानिमित्त आज ज्येष्ठ अभिनेते आणि नाम फाउंडेशनचे सर्वेसर्वा नाना पाटेकर यांच्या पुण्यातील सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याजवळ असलेल्या नानाच्या वाडीला भेट देऊन तिथे विराजमान झालेल्या श्री गणेशाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि त्यावर करायच्या विविध उपाययोजना तसेच शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी नाम फाऊंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमातून काय काय करता येणे शक्य आहे याबाबत आमची सविस्तर चर्चा झाली. यावेळी नाना यांचा मुलगा मल्हार पाटेकर, पत्नी नीलकांती पाटेकर तसेच पाटेकर कुटुंबातील अन्य सदस्य तसेच आजूबाजूचे ग्रामस्थ, नानांचे आणि माझे सहकारी उपस्थित होते. #NanaPatekar #Pune #गणपती #बाप्पा #मोरया #गणेशोत्सव२०२६ #Ganeshotsav2026 #EknathShinde #Maharashtra @nanagpatekar
27
201
701
30,323
Eknath Shinde Live । किसन नगर, ठाणे जनजागृती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ - श्री गणेशाची पूजा व आरती - लाईव्ह nitter.net/i/broadcasts/1yKAPwQoZ…
23
159
159
8,558