देशाचे यशस्वी पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या संवैधानिक कारकिर्दीला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या वतीने ठाणे येथे आयोजित ‘सेवा संकल्प अभियाना’ अंतर्गत ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहपूर्ण वातावरणात सुरू करण्यात आली.
तलावपाळी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सेवा, समर्पण आणि संघटनशक्तीचा संदेश देत सेवा ज्योती प्रज्वलित करून जनसेवेच्या या पवित्र संकल्पाचा प्रवास सुरू करण्यात आला.
उत्साहाने सहभागी झालेल्या असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण परिसर सेवाभाव आणि राष्ट्रभक्तीच्या ऊर्जेने भारावून गेला होता. जनसेवेचा संकल्प, राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य आणि विकसित भारताचे ध्येय घेऊन मोदीजींची सुरू असलेली अखंड वाटचाल आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. या २५ वर्षांच्या सेवायात्रेतून प्रेरणा घेत जनकल्याणासाठी अधिक समर्पित भावनेने कार्यरत राहण्याचा संकल्प निरंतर दृढ ठेवण्याचा यावेळी केला.
या सेवा ज्योती यात्रेत उपमहापौर श्री. कृष्णा पाटील, ठाणे जिल्हाध्यक्ष श्री. संदीप लेले, गटनेते तथा नगरसेवक श्री. मुकेश मोकाशी, नगरसेवक श्री. अमित सरैया,नगरसेविका सौ. अनिता ठाकूर, सरचिटणीस श्री. सचिन पाटील, डॉ. समीर भारती, श्री. विक्रम भोईर, उपाध्यक्ष डॉ. राजेश मढवी, उपाध्यक्ष श्री.राम ठाकूर, भाजप अनुसूचित जाती मोर्चा ठाणे जिल्हाध्यक्ष वीरसिंग पारछा, महिला मोर्चा अध्यक्षा स्वप्नाली साळवी यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
📍 ठाणे
🗓️ ७ ऑक्टोबर २०२६
#SevaSankalp #SevaJyotiYatra #NationFirst #NirantarDhyas #NiranjanDavkhare