Committed to a better Maharashtra & @NCPspeaks MLA from Karjat-Jamkhed CEO Baramati Agro mez.ink/mlarohitpawar

Maharashtra, India
Rohit Pawar retweeted
आ. रोहितदादा पवार यांचा राहुरी, श्रीरामपूर आणि संगमनेर दौरा...
1
4
183
#MPSC च्या विद्यार्थ्यांनी घोषित केलेल्या आंदोलनासंदर्भात चर्चा करण्यासाठी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार साहेबांनी चर्चेला बोलावल्यानुसार विद्यार्थी प्रतिनिधींसोबत त्यांची भेट घेऊन चर्चा केली. गेले बारा दिवस पोलीस दलावर गणेशोत्सवाच्या बंदोबस्ताचा प्रचंड ताण असल्याने २७ सप्टेंबर रोजी होणारं आंदोलन पुढे ढकलण्याची विनंती त्यांनी केली. त्यांच्या विनंतीचा मान राखत आणि पोलीस दलावर अधिक ताण नको म्हणून २७ सप्टेंबरऐवजी ज्यांनी जगाला सत्याग्रहाचा मार्ग दाखवला, त्या महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या दिवशी म्हणजेच शुक्रवार, दि. २ ऑक्टोबर रोजी विद्यार्थीही सत्याग्रह करणार आहेत. या सत्याग्रहाला सुरुवात झाल्यानंतर MPSC च्या भ्रष्ट अध्यक्षांचं विसर्जन झाल्याशिवाय माघार नाही, असा निर्धारच आज विसर्जन होत असलेल्या गणरायाच्या साक्षीने विद्यार्थ्यांनी केला. विशेष म्हणजे, पोलिसांनीही २ ऑक्टोबर रोजी आंदोलनास परवानगी देण्याची तयारी दर्शवली. त्यामुळं आता २७ सप्टेंबरऐवजी २ ऑक्टोबर रोजी पुण्यात पत्रकार संघासमोरील एस. एम. जोशी मार्गावर विद्यार्थी सत्याग्रह होणार आहे. तत्पूर्वी हा सत्याग्रह होऊ नये, अशी सरकारची इच्छा असेल, तर तो थांबवणंही सरकारच्याच हातात आहे. सरकारने विद्यार्थ्यांसोबत चर्चा करून मार्ग काढला तर चर्चेची विद्यार्थ्यांची तयारी आहे आणि त्यासाठी सोबत विद्यार्थी प्रतिनिधींची नावेही देत आहोत. किंवा #MPSC च्या भ्रष्ट अध्यक्षांच्या राजीनाम्यासह सर्व मागण्या मान्य केल्या, तर विद्यार्थी स्वतःहूनच हा सत्याग्रह थांबवतील; अन्यथा मागण्या मान्य होईपर्यंत माघार नाही. या चर्चेच्या वेळी सर्वपक्षीय प्रतिनिधी आणि विद्यार्थी उपस्थित होते. @Dev_Fadnavis @mpsc_office #MPSCविद्यार्थी_सत्याग्रह #MPSCStudents #MPSC #StudentsFirst
11
88
276
11,290
📌 लाईव्ह | #MPSC पेपरफुटी घोटाळा | 25 September 2026 | Live | nitter.net/i/broadcasts/1yKAPwQBy…
13
17
65
3,120
#MPSC च्या औषध निरीक्षक परीक्षेत पेपर फोडणारे रॅकेट राज्यभर असून, आम्ही स्वतः शंभरहून अधिक नावं दिली होती. परंतु आयोगाने मात्र प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थी एकजुटीचा परिणाम दिसत असून, अखेर आज आणखी चार घोटाळेबाजांना अटक झाली आहे. सुरुवातीला एकाच उमेदवाराला फायदा झाल्याचं सांगणारे भ्रष्ट अध्यक्ष आज पुन्हा उघडे पडले आहेत. सत्य दडपण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी सत्य समोर आल्याशिवाय राहत नाही. भ्रष्ट अध्यक्षांचा क्रूर चेहरा समोर आणूच! विशेष म्हणजे, आज अटक झालेले दोन उमेदवार COMBINE 2025 MAINS च्या मेरिट लिस्टमध्ये देखील आहेत. हा गोंधळ खूप मोठा आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, तत्काळ आयोग बरखास्त करून क्लीनअप करा. विषय गंभीर आहे. कर्णासारखं मैत्रीत आंधळं होऊन दुर्योधनाला पाठीशी घालू नका! @Dev_Fadnavis @mpsc_office #MPSC #PeperLeak #पेपरफुटी
43
178
440
11,191
📌 लाईव्ह | पुणे | #MPSC विद्यार्थी आंदोलन | CP Office | 25 September 2026 | Live | nitter.net/i/broadcasts/1DGleVWRa…
5
28
68
2,585
📌 लाईव्ह | पुणे | #MPSC विद्यार्थी आंदोलन | CP Office | 25 September 2026 | Live | nitter.net/i/broadcasts/1yxBePQja…
6
20
73
2,334
📌 लाईव्ह | पुणे | #MPSC विद्यार्थी आंदोलन | CP Office | 25 September 2026 | Live | nitter.net/i/broadcasts/1nxnRBZLE…
16
33
90
4,646
कोरडा दुष्काळ जाहीर करावा.. म्हणून शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांसमवेत पंढरपूरमध्ये 'धडक मोर्चा' ! राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार, पद्मविभूषण आदरणीय शरद पवार साहेब ह्यांच्या मार्गदर्शनाखाली, महासंसदरत्न खासदार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुप्रियाताई सुळे ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री श्री. शशिकांत शिंदे ह्यांच्या नेतृत्वात... पंढरपूरमध्ये 'धडक मोर्चा' ! । शनिवार, २६ सप्टेंबर २०२६ स्थळ : छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसील कार्यालय, पंढरपूर.
11
42
2,485
निवडणूक आयोगाचा कारभार आणि पारदर्शकतेवर आज निर्माण झालेलं प्रश्नचिन्ह पाहता "पंतप्रधानांवर आणि राज्यकर्त्यांवर ठेवलेल्या 'संविधानिक विश्वासाचा' प्रत्यक्ष व्यवहारात विश्वासघात झाला आहे का?" या सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाचं उत्तर दुर्दैवाने ‘‘होय, १०० टक्के विश्वासघात झाला’’, असंच द्यावं लागेल. हा प्रश्न केवळ विश्वासघातापुरताच मर्यादीत नाही तर घटनात्मक संस्थांवर ताबा घेऊन लोकशाही व संविधान धोक्यात आणण्याचाही हा प्रयत्न आहे आणि गेल्या काही वर्षांत दुर्दैवाने तो यशस्वी होताना दिसतोय. घटनात्मक स्वायत्तता असलेल्या संस्थांनी सरकारच्या हातातील बाहुलं न बनता संविधानाने दिलेल्या नैतिकतेचं पालन केलं पाहिजे, तरच जनतेचा लोकशाहीवरील विश्वास टिकून राहील, ही संविधानकर्त्यांची अपेक्षा नक्कीच योग्य आहे पण त्यासाठी जनतेनेही आवाज उठवला पाहिजे. समाधानाची बाब म्हणजे हा आवाज आज बुलंद होतोय आणि यात Gen-Z पण आघाडीवर आहे, तसंच जनता आणि न्यायासनावरील व्यक्तीही न घाबरता बोलतायेत, हेही महत्त्वाचं आहे. संविधान बदलण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी लागणारं पाशवी बहुमत मिळवण्यासाठी तर भाजप निवडणूक आयोगाला हाताशी धरुन प्रयत्न करत नाही ना? याच प्रयत्नाचा भाग म्हणून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांचं आज उघडकीस आलेलं वर्तन हे भाजपाला जिंकवण्यासाठीच होतं हे स्पष्ट होतं. अशा परिस्थितीत महाराष्ट्र, हरियाणा आणि पश्चिम बंगाल या राज्यात फेरनिवडणुका का होऊ नयेत? #ElectionCommissionOfIndia #लोकशाही #संविधान #Constitution #SaveDemocracy
4
24
121
4,347
ही केवळ एका संपादकांचीच नाही तर अंधभक्त सोडून लोकशाहीवर विश्वास असलेल्या देशातील तमाम मतदारांची भावना आहे...
13
183
987
16,895
घेतो निरोप बाप्पा, आज्ञा असावी... चुकले आमुचे काही, क्षमा करावी... भरले होते आभाळ तू येताना... आता भरले डोळे तू जाताना... हे गणराया, राज्यातील शेतकऱ्यांवरील दुष्काळाचे संकटं आणि विघ्न दूर कर. कष्टकरी शेतकरी, कामगार आणि युवा यांच्या आयुष्यात आशेचा नवा किरण घेऊन ये. महिलांना सुरक्षित आणि सन्मानाने जगण्याचे बळ दे. राज्यातील सर्व जाती-धर्मातील नागरिकांमध्ये बंधुभाव, एकोपा आणि सौहार्द कायम राहू दे. सत्ताधाऱ्यांना जनतेच्या प्रश्नांची जाणीव होऊन त्यांचं निराकरण करण्याची सद्बुद्धी दे. आणि जनतेच्या हक्कासाठी, त्यांच्या प्रश्नांसाठी आणि न्यायासाठी संघर्ष करण्याचे बळ, धैर्य आणि शक्ती आम्हाला दे, हीच तुझ्या चरणी प्रार्थना! अनंत चतुर्दशीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा! गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या! #गणपती_बाप्पा_मोरया #GanpatiBappaMorya #अनंत_चतुर्दशी
3
4
85
2,585
📌 पुणे #MPSC विद्यार्थी आंदोलनाची स्थळ पाहणी… Live nitter.net/i/broadcasts/1rxmqpnLZ…
21
76
237
6,550
छत्रपती संभाजीनगर-जालना दुष्काळ पाहणी आणि शेतकरी आक्रोश मोर्चा बीड.. #दुष्काळ #महाराष्ट्र #बळीराजा #मराठवाडा
3
8
618
शेटफळगढे (ता. इंदापूर, जि. पुणे) येथील श्री नागेश विद्यालय व ज्युनिअर कॉलेज आणि रयत इंग्लिश मिडियम स्कूलच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या थोर शिक्षणमहर्षी आणि ‘रयत’चे संस्थापक, पद्मभूषण डॉ. भाऊराव पाटील यांच्या जयंती सोहळ्याला उपस्थित राहून मार्गदर्शन केलं. 'कमवा व शिका' या स्वावलंबी शिक्षणाचा मार्ग दाखवून बहुजन समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवण्याचं पवित्र कार्य कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केलं. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून दुर्गम भागात शाळा आणि वसतिगृहांचे जाळं निर्माण केलं. त्यांचं हे महान शैक्षणिक आणि सामाजिक कार्य आजही आपल्या सर्वांसाठी दीपस्तंभासारखे कायम मार्गदर्शक राहील आणि त्यांनी घालून दिलेल्या मार्गाने जाण्याचा कायम प्रयत्न करणं हीच त्यांना आज आदरांजली ठरेल, अशा भावना यावेळी व्यक्त केल्या. ‘रयत’चे सहसचिव बी. एन. पवार, सुभाष आबा गुळवे, प्रसिद्ध व्याख्याते प्रा. मानाजी गावडे, प्रा. जितेंद्र गावडे यांच्यासह शिक्षक, पालक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
5
2
55
3,026
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं बेलापूर इथं प्रशस्त ऑफिस असताना देखील भ्रष्ट अध्यक्ष भिमनवार साहेबांसाठी कफ परेडच्या वर्ल्ड ट्रेड सेंटर इथं सेंटर वन बिल्डिंगला १२व्या मजल्यावर ४,००० sq. ft.चं, साधारणतः १० लाख रु. प्रतिमहिना भाडं असलेलं प्रशस्त, lavish आणि exclusive ऑफिस घेतलं असून या ऑफिसचं भिमनवार साहेब थोड्याच वेळात गुपचूप उद्घाटन करून आसनस्थ होणार आहेत. एकीकडे आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह असताना अध्यक्ष मात्र अशाप्रकारे उधळपट्टी करत आहेत. गोरगरीब विद्यार्थ्यांकडून एकेक हजार रुपये परीक्षा फी घेता आणि दुसरीकडे मात्र स्वतःसाठी १० लाख रु. प्रतिमहिना भाडं असलेलं ऑफिस घेता, हे शोभतं का? राजकीय खलबतं करता यावीत, कलेक्शनचं गणित आखता यावं यासाठी मंत्रालय परिसरात हे नवं ऑफिस घेतलंय का? आयोगाचं कार्यालय बेलापूर आणि अध्यक्ष कफ परेडला बसणार असतील तर आयोगाचा कारभार चालेल कसा? घोटाळे करायला रान मोकळं हवं म्हणून हे कार्यालय घेतलं का? आम्ही आधीपासून सांगतोय, विद्यमान अध्यक्ष भिमनवार भ्रष्ट आहेत आणि ते आयोगाची वाट लावत आहेत. सरकारने तत्काळ त्यांचा राजीनामा घ्यावा!
48
471
1,337
51,531
रविवार २७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वा. पुण्यात पत्रकार भवनासमोरील एस. एम. जोशी रस्ता, गांजवे चौक इथं #MPSC च्या विद्यार्थ्यांचं आंदोलन अटळ आहे… या आंदोलनाच्या स्थळ पाहणीसाठी आज (गुरुवार, दि. २४) सायंकाळी ६.१५ वाजता जाणार आहे. स्थळाबाबत विद्यार्थ्यांच्या काही सूचना असतील तर सायंकाळी प्रत्यक्ष भेटूनच चर्चा करु.
21
138
466
18,693
राज्यातील शेतकरी दुष्काळाच्या आगीत होरपळत असताना या शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याऐवजी हे सरकार औपचारिकता पूर्ण करण्यात वेळ घालवत आहे. त्यामुळं या सरकारला जागं करण्यासाठी राज्यातील शेतकरी, शेतमजूर यांना भरीव मदत मिळावी या मागणीकडं लक्ष वेधण्यासाठी आदरणीय पवार साहेबांच्या आशीर्वादाने आ. संदीप भैय्या क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली बीडमध्ये शेतकऱ्यांचा विराट आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला उपस्थित राहून शेतकऱ्यांशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी मागील वर्षी जाहीर करुनही शेतकऱ्यांना अद्याप हेक्टरी १७ हजार रुपये पीक विम्याची रक्कम मिळाली नाही. ही रक्कम मिळण्यासोबतच यंदा पीक विम्याची १०० टक्के नुकसानभरपाई तसंच शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये, शेतमजूरांना प्रती कुटुंब २५ हजार रुपये आणि सरसकट मदत देण्याची मागणी यावेळी केली. येत्या पंधरा दिवसांत ही मागणी पूर्ण केली नाही तर समृद्धी महामार्गावर शेतकऱ्यांचं विराट आंदोलन करुन हा महामार्ग बंद पाडण्यात येईल, असा इशाराही यावेळी सरकारला दिला. यावेळी आ. संदिप क्षीरसागर जी, मा. आ. चंद्रकांत दानवे जी, मा. आ. संजय वाघचौरे जी, मा. आ. सय्यद जी सलीम, मा. आ. पृथ्वीराज साठे जी, मा. आ. उषाताई दराडे, सक्षणाताई सलगर, रविकांत वरपे, विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुशील बोर्डे, हेमाताई पिंपळे, जगन्नाथ काकडे, प्रदेश सरचिटणीस पंकजनाना बोराडे, मोहनराव जगताप, डॉ. नरेंद्र काळे, भगवान आलेगावकर, डॉ. प्रतापसिंह पाटील, संजय शेटे, पांडुरंग तांगडे पाटील, संजय शेटे, अजय गव्हाणे, राजाभाऊ फड, राजाभाऊ देशमुख, बबलू चौधरी, अतुल गव्हाणे, संजय काळबांडे, राजेंद्र म्हस्के यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक संघटनेचे प्रतिनिधी आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. #दुष्काळ_जाहीर_करा #शेतकरी_आक्रोश_मोर्चा #जालना #पीक_नुकसान
4
7
29
2,874