Sunday Wisdom!'चांगले'?अधिकारी निवडीसाठी "वर्णनात्मक की वस्तुनिष्ठ मुख्य परीक्षा" ही चर्चाच मुळी अप्रस्तुत.परीक्षेेतूून साध्य करावयाच्या उद्दिष्टांवर तीच्या स्वरूपाची प्रासंगिकता अधोरेखीत."आधुनिक तंत्रज्ञानाचे युग व नागरिकांच्या बदललेल्या आकांक्षाची सत्वर पूर्ती" यास्तव सुयोग्य व्यक्तीची तत्परतेेने निवड करणे व वर्णनात्मक उत्तरपत्रिकांंच्या मुल्यांकनातील आव्हानांवर मात करण्याचे उद्देेशाने,यापूर्वी
#MPSC ने स्विकारलेल्या पर्यायी परीक्षा योजनेत कालसुसंगत सुधारणा करत पुुढे जाण्याऐवजी आभासी अपेक्षांच्या उद्देेशाने,जुन्या परीक्षा योजनेतील वैकल्पिक विषयांचा नव्याने केलेला अनावश्यक प्रयोग, उत्तरपत्रिकांच्या मुल्यांकनावर झालेले आरोप व त्यामुुळे करावे लागलेले फेरमुल्यांकन,यांत कोलमडलेेल्या नियोजनाची झळ सर्वांनाच.
'पाठांंतर करून वस्तुनिष्ठ प्रश्नपत्रिका सोडवणे सोपे' क्लास चालकांच्या अशा विस्मयकारक दाव्याला व्यावसायिक हीतसंबंधाची किनार तर विशिष्ट परीक्षा पद्धतीच्या लाभार्थी वर्गांचा त्या परीक्षा पद्धतीसाठी असलेला आग्रह हा समजण्याजोगा.
वर्णनात्मक उत्तरपत्रिकांच्या मुुल्यांंकनात वेगवेगळ्या परीक्षकांंनी दिलेल्या गुणांमधील तफावत केवळ स्पर्धा परीक्षांपूरती मर्यादित नव्हे तर ती विद्यापीठीय परीक्षांमधे सुद्धा. तद्वतच विशीष्ट विद्यापीठांत गुणदान करतांंना परीक्षकांंचा हात सैल तर अन्य विद्यापीठांत तो आखडता याचीही बर्याचदा प्रचिती.असाच अनुुभव भिन्न विद्याशाखांतील विषयांतही. काही विषयांत नुसतीच भूमिका बांधणीचा फाफट पसारा तर काही विषयांत मुद्द्यांच्या नेमकेपणाला अनन्य साधारण महत्व.अशा कारणांमुळे येणाऱ्या गुण तफावतीची तिव्रता कमी करण्यासाठीच तर स्पर्धा परीक्षांत वैैकल्पीक विषयांतील गुणांचे सामान्यीकरण.
मुल्यांकनाच्या गुणवत्तेेतील "तटस्थता व अचूकता" या निकषांवर मात्र बहुुपर्यायी 'वस्तुनिष्ठ' परीक्षा पद्धत 'वर्णनात्मक' परीक्षा पद्धतीवर निर्विवाद श्रेष्ठ!