नुकतेच पदवीधर (Graduate) झालेल्या माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांनो, दादांनो आणि ताईंनो, तुम्ही स्पर्धा परीक्षेच्या (MPSC) क्षेत्रात उतरलात आणि डिस्क्रिप्टिव्ह (वर्णनात्मक) पॅटर्ननुसार अभ्यास करत होता. तुम्हाला वाटले की पॅटर्न बदलेल. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी काही लोकांनी तुमच्या मनात उगाच भीती निर्माण केली😨"पॅटर्न ऑब्जेक्टिव्ह (वस्तुनिष्ठ) होऊ देऊ नका, लढा! जुन्या विद्यार्थ्यांना १० हजार MCQ तोंडपाठ आहेत, तुम्हाला पोस्ट मिळणार नाही." या खोट्या भीतीपोटी तुम्ही आंदोलने केलीत, तुमचे कौतुकच आहे. अन्याय होतोय असे वाटल्यावर, अगदी १०-१२ जण का असेना, तुम्ही तुमचे म्हणणे मांडले. पण आता सर्व शांत झाले आहे, तर दादा आणि ताईंनो, मी तुम्हाला एक कटू सत्य सांगतो. MPSC मध्ये 'ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न' झाला, तर त्यातच विद्यार्थ्यांचे सर्वात मोठे हित आहे. राज्यसेवेचे खरे वास्तव समजून घ्या ,कधी १०० जागा येतात, तर कधी १२०. इतक्या कमी जागांसाठी डिस्क्रिप्टिव्हसारखा अपारदर्शक आणि पूर्णपणे कोचिंग क्लासेसवर अवलंबून असलेला पॅटर्न योग्य नाही. तुम्हाला माहित आहे का? जर तुम्ही ऑब्जेक्टिव्ह राज्यसेवेचा अभ्यास केलात, तर कम्बाईन (Group B आणि C) मधून पुढील ३ वर्षांत एखादी पोस्ट मिळवून तुम्ही किमान आर्थिकदृष्ट्या सक्षम (Financially Secure) होऊ शकता. पण १००-१२० जागांच्या राज्यसेवेसाठी वर्षभर डिस्क्रिप्टिव्हचा अभ्यास करत बसलात, तर Group B आणि C च्या एका तासाच्या तीव्र स्पर्धेत तुम्ही टिकू शकला नसतात. राज्यसेवा ऑब्जेक्टिव्ह झाली, तर तुमच्यासाठी संधींची कवाडे उघडी होतील. आम्ही गेल्या ४ वर्षांपासून MPSC चा अनुभव घेत आहोत म्हणूनच हे सांगत आहोत. अभ्यासक्रम आणि पॅटर्न सारखा असल्याने वनसेवा (Forest), राज्यसेवा, PSI, STI पासून अगदी लिपिक (Clerk) पदापर्यंत अनेक पर्याय उपलब्ध होतात. तुम्ही नवीन आहात, त्यामुळे सुरुवातीला आत्मविश्वास खूप असतो 👍आम्हाला त्याची जाणीव आहे. पण जर ९९% विद्यार्थी ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नची मागणी करत असतील, तर त्या विचारात नक्कीच काहीतरी तथ्य असेल. Descriptive राहिले तर दरवर्षी पेपर रिचेकिंग ला जात राहतील खूप अपारदर्शक आहे Descriptive पॅटर्न मध्ये. @BaliramDoleyINC @yogsara @GaneshgSpeaks
1
6
120
OBJECTIVE आंदोलनात पाठिंबा देण्या साठी ऍडव्होकेट श्री.गुणरत्न सदावर्ते अहिल्या लायब्ररी जवळ आले आहेत. OBJECTIVE २०२७ 🔥🚒🚒 @yogsara @GaneshgSpeaks
1
2
21
685
टेक्निकल परीक्षा सुद्धा objective पॅटर्न नेच झाले पाहिजे. 🔥 गट क 2026 मध्ये अभियांत्रिकी विभागाचे सर्व जलसंपदा, जलसंधारण, बांधकाम, पाणीपुरवठा, महसूल, वन या सर्व जागा तातडीने भरण्यात याव्या तसेच गट अ,  गट ब   2027 रिक्त पदांचा समावेश असावा. तांत्रिक संवर्ग ( कृषी/#FSO/ अभियांत्रिकी) देखील #Objective करण्यात यावी.. महावितरण, महापारेषण, महानिर्मिती रिक्त पदांची पदभरती तत्काळ सुरू करावी......! @EA_OfficialMH @GaneshgSpeaks @BaliramDoleyINC @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @yogsara
8
83
93
2,024
धन्यवाद आदरणीय आमदार श्री. योगेश टिळेकर साहेब. OBJECTIVE पॅटर्न २०२७ पासून लागू झालाच पाहिजे. 🔥 @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @iYogeshTilekar
आपल्या न्याय्य हक्कांसाठी आणि भविष्यासाठी संघर्ष करणाऱ्या MPSC विद्यार्थी मित्रांशी आज सायंकाळी ७ वाजता अहिल्या शिक्षण मंडळ, शास्त्री रोड, पुणे येथे भेट घेऊन संवाद साधणार आहे. विद्यार्थ्यांच्या अडचणी, परीक्षा प्रक्रियेतील प्रश्न आणि त्यांच्या मागण्या प्रत्यक्ष समजून घेण्यासाठी ही भेट आयोजित केली आहे. विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून त्यांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करूया. 📍 स्थळ : अहिल्या शिक्षण मंडळ, शास्त्री रोड, पुणे ⏰ वेळ : आज सायंकाळी ७ वाजता विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी, त्यांच्या प्रत्येक अडचणीवर संवादातून मार्ग काढूया! #mpsc #students
1
7
19
395
आदरणीय रोहित दादा, तुम्ही आमच्यासाठी जिवाचे रान करत आहात दादा, पण आता तरी विद्यार्थ्यांची जी एक मुख्य आणि अत्यंत महत्त्वाची मागणी आहे राज्यसेवा२०२७ पासून मुख्य परीक्षा वस्तुनिष्ठ (OBJECTIVE) पद्धतीनेच व्हावी ती प्लीज मान्य करून घ्या ना दादा. @RRPSpeaks @GaneshgSpeaks @BaliramDoleyINC @EA_OfficialMH
1
12
29
637
धन्यवाद आदरणीय आमदार श्री. अमित गोरखे साहेब. OBJECTIVE २०२७ पासून लागू झालेच पाहिजे.
आपल्या न्याय्य हक्कांसाठी, भविष्यासाठी...रस्त्यावर उतरून लढा देणाऱ्या MPSC च्या संघर्षशील विद्यार्थी मित्रांच्या भेटीसाठी आज सायंकाळी ठीक ०६:३० वाजता 'अहिल्या शिक्षण मंडळ, शास्त्री रोड' येथे येत आहे. हा लढा केवळ एका परीक्षेचा नसून लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा आणि अस्तित्वाचा आहे. विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी आणि त्यांचा आवाज अधिक बुलंद करण्यासाठी सर्व विद्यार्थी मित्रांनी एकत्र यावे, चर्चा करूया! ठिकाण: अहिल्या शिक्षण मंडळ, शास्त्री रोड, पुणे वेळ: आज सायंकाळी ०६:३० वाजता अभ्यासाच्या वाटेवरील अडचणी, परीक्षा, चर्चा आणि बरंच काही... भेटूया संध्याकाळी! @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @RaviDadaChavan @cbawankule @ChDadaPatil @ShelarAshish @BJP4Maharashtra #MPSC #MPSCStudentProtest #Pune #JusticeForMPSCStudents #AmitGorkhe
1
1
13
415
2012-2014 या काळात MPSC चे अध्यक्ष राहिलेले आदरणीय IAS श्री. सुधीर ठाकरे साहेब यांनी भारतात इतर कोणत्याही राज्यात नव्हता असा एक क्रांतिकारी पॅटर्न आणला. त्यांनी पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य देऊन वस्तुनिष्ठ (Objective) पद्धतीचा अवलंब केला आणि राज्यसेवा, अन्न सुरक्षा अधिकारी (FSO), कृषी सेवा व अभियांत्रिकी सेवा यांसारख्या सर्व महत्त्वाच्या परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपात घेऊन विद्यार्थ्यांना खरा न्याय दिला. त्यांच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रात विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या कोचिंग माफियांसारख्या व्यवस्थेला उभे राहता नाही आले आणि संपूर्ण परीक्षा पद्धत ही केवळ आणि केवळ प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या हिताचीच राहिली. एमपीएससीच्या (MPSC) इतिहासाचा जेव्हा जेव्हा अभ्यास केला जाईल, तेव्हा आदरणीय श्री. सुधीर ठाकरे साहेबांचे नाव अत्यंत आदराने आणि अभिमानाने घेतले जाईल. एमपीएससीमधील या अभूतपूर्व बदलांसाठी त्यांना नेहमीच 'महाराष्ट्राच्या MPSC च्या सुधारणांचे जनक' (Father of Reforms) म्हणून सदैव लक्षात ठेवले जाईल. @MeshramDayanand @yogsara @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @GaneshgSpeaks @BaliramDoleyINC
5
52
93
1,962
मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नची मागणी आपण फक्त पारदर्शकतेसाठी करत आहोत आणि म्हणूनच ती लगेच मान्य होईल. पण पडद्यामागून मोठ्या आणि बलाढ्य शक्ती काम करत आहेत. समोर दिसणारे लोक हे फक्त पैसे देऊन आणलेले चेहरे आहेत, पण त्यांच्या मागे मोठ्या कोचिंग माफियांनी तुमच्याविरोधात प्रचंड आर्थिक ताकद लावली आहे. विचार करा आणि सावध व्हा... ही चळवळ आता केवळ एका पॅटर्नची उरलेली नाही, तर ही सामान्य विद्यार्थी विरुद्ध कोचिंग माफिया अशी चळवळ आहे. @GaneshgSpeaks @BaliramDoleyINC
4
29
56
1,021
अरे लेका, तू तर लयच बढाया मारतोयस जसं की तूच गव्हर्नन्सचा सगळा गाढा एकटा ओढून नेलायस! पण वस्तुस्थिती ही आहे की तुझे बेसिक कॉन्सेप्ट्ससुद्धा क्लिअर नाही आहेत. त्या तुझ्या so called "सर"ने तुला शिकवलेली संकल्पनाच मुळात चुकीची आहे, हे मोठमोठ्या बाता मारण्याच्या नादात तू सोयीस्करपणे विसरलास. आम्ही ऑब्जेक्टिव्ह राज्यसेवा मुख्य परीक्षा (GS-2) मध्ये जे गव्हर्नन्स शिकलोय, त्यानुसार धोरणात्मक लकवा (Policy Paralysis) म्हणजे जिथे सरकार किंवा सनदी अधिकारी कोणताही निर्णय घ्यायला इतके घाबरतात की ते पुढे जायलाही टाळाटाळ करतात आणि मागे फिरायलाही! पण तू? पूर्ण अभ्यास वाचायच्या आधीच उतावळा होतोयस मित्रा! आधी जरा बेसिक कॉन्सेप्ट्स क्लियर करून घे. सांगायला तर सांगतोयस "मी UPSC करतोय", पण पॉलिसी पॅरालिसिससारखी(POLICY PARALYSIS)अगदी प्राथमिक संकल्पनासुद्धा तुला माहिती नाही! तू म्हणतोयस की जर समिती रिव्हर्स गेली म्हणजे धोरणात्मक लकवा आहेत तो ,उलट समितीने पारदर्शकतेसाठी ९९ टक्के विद्यार्थ्यांच्या मागणीवरून रिव्हर्स निर्णय घेतला आणि पुन्हा हा अपारदर्शक डिस्क्रिप्टिव्ह बाजूला सारून ऑब्जेक्टिव्ह आणला, तर त्या निर्णयाला "धाडसी निर्णय" (Bold Decision) म्हटलं जाईल, पॉलिसी पॅरालिसिस नाही! तू उगाच त्या विवेकानंद पाटीलची कॉपी करायला जाऊ नकोस. त्याचं व्यक्तिमत्त्व खूप मोठं आहे, अभ्यासू पोरगा आहे तो! ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नचा दांडगा अभ्यास केलेला पोरगा आहे तो. तू त्या क्लासवाल्यांच्या नादी लागू नकोस, त्यांनी तुझे धड कॉन्सेप्ट्ससुद्धा क्लियर केलेले नाहीत! ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने अभ्यास कर, म्हणजे प्रत्येक पॉइंट अगदी इन-डेप्थ शिकशील! @GaneshgSpeaks @BaliramDoleyINC
6
19
48
2,506
मी ३-४ ठिकाणी पाहिलंय, MPSC मध्ये एक नवीन पोरगा आलाय डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नकरनर, कुठेही गेला की याचं एकच गाणं सुरू— "ऑब्जेक्टिव्हला काय, 'गांधीजी भारतात कधी आले?' एवढे बालिश प्रश्न विचारतात. पण आमच्या डिस्क्रिप्टिव्हला गांधीजी कधी आले, का आले, कशासाठी आले... हे सगळं लिहावं लागतं!" वाह भावा! ३-३ ठिकाणी हेच एक उदाहरण देऊन तू तर क्रांतीच केलीस. बस कर आता, उगीच स्वतःचं हसू करून घेऊ नकोस. तुझ्या या अफाट अहंकारात बुद्धी नाही, फक्त बालिशपणाच दिसतोय. त्या क्लासवाल्यांच्या नदी नको लागू . २-३ प्रीलिम्सचे नारळ फुटले ना, की आपोआप शांत होशील! एक विद्यार्थी म्हणून सांगतोय, काही वर्षांनी स्वतःचे हे व्हिडिओ बघशील ना, तर तुला स्वतःला एमबारॅसमेंट होईल आणि मित्रा, तू म्हणतोयस की ३-४ लोकांचे पेपर बघून गुणांमध्ये तफावत दाखवली ते खोटं आहे... अरे नवख्या मित्रा, खुद्द मुख्यमंत्र्यांनी चौकशी करून राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ च्या उत्तरपत्रिकांच्या फेरतपासणीचे (री-चेकिंगचे) आदेश दिले आहेत. तुझा डिस्क्रिप्टिव्हचा अभ्यास इतका प्रचंड झालाय का, की तुला वाटतंय मुख्यमंत्री सुद्धा उगीच २-४ लोकांचं ऐकून निर्णय घेतील? म्हणून सांगतोय भाऊ, शांत राहून अभ्यास कर! पॅटर्न कोणताही असो, अभ्यास करशील तरच अधिकारी बनशील. उगीच ते एकच उदाहरण देऊन स्वतःचा तमाशा करू नकोस! खूप बालिश दिसतंय ते! OBJECTIVE आम्हाला पारदर्शकते साठी हवी आहे. @GaneshgSpeaks @yogsara @BaliramDoleyINC
12
35
94
5,918
धन्यवाद श्री. निरंजन डावखरेजी 🙏🙏 OBJECTIVE २०२७ झालेच पाहिजे. @niranjandtweets @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @GaneshgSpeaks @BaliramDoleyINC @yogsara
आज पुणे येथील शास्त्री पेठ येथे MPSC ची पूर्वतयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या विविध मागण्या व प्रश्न समजून घेतले. विद्यार्थ्यांचे भवितव्य हा केंद्रस्थानी असलेला विषय आहे. यासंदर्भात २५ विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत दोन-तीन वेळा बैठक होऊन सविस्तर चर्चा झाली. विद्यार्थ्यांची फी माफी, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवरील प्रश्नांसह सुमारे २० ते २२ विषयांवर सकारात्मक चर्चा झाली आहे. अध्यक्षांच्या राजीनाम्याचा विषय हा घटनात्मक पदाशी संबंधित असल्याने त्याबाबत निश्चित कायदेशीर प्रक्रियेनुसारच निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका मा. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली आहे. या एका मुद्द्याभोवती आंदोलनाचे राजकारण न होता विद्यार्थ्यांच्या इतर महत्त्वाच्या मागण्यांवरही लक्ष केंद्रित होणे आवश्यक आहे. ‘ऑब्जेक्टिव्ह’ पॅटर्नसंदर्भात मा. मुख्यमंत्र्यांनी सहा सदस्यांची समिती स्थापन केली असून, विद्यार्थ्यांनी आपली मते, सूचना आणि निवेदने या समितीसमोर रीतसर मांडावीत. समिती प्रत्यक्ष विद्यार्थ्यांशी संवाद साधून आणि विविध बाजू समजून घेऊन निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा वापर राजकीय हेतूंसाठी करून ते भरकटवण्याचे प्रयत्न होत आहे मात्र, अशा परिस्थितीतही रात्रंदिवस मेहनत करून परीक्षा देणाऱ्या प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये, हीच भूमिका महत्त्वाची आहे. मार्किंग असो अथवा परीक्षेच्या प्रक्रियेशी संबंधित अन्य कोणताही विषय असो, विद्यार्थ्यांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी शासनाने पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाची भूमिका कायम ठेवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर सकारात्मक आहेत, राज्य सरकार विद्यार्थ्यांसोबत आहे, असा विश्वास यावेळी आंदोलनकर्त्यांना दिला. 📍 पुणे 🗓️ ६ ऑक्टोबर २०२६ #MPSC #StudentIssues #Youth #NirantarDhyas #NiranjanDavkhare
6
20
521
उद्या सर्व स्थापत्य, विद्युत, यांत्रिकी अभियांत्रिकी विभागाचे विद्यार्थी #objective पॅटर्न साठी अहिल्या लायब्ररी येथे 9:00 वाजल्यापासून असणार आहेत.. गट क 2026 मध्ये अभियांत्रिकी विभागाचे सर्व जलसंपदा, जलसंधारण, बांधकाम, पाणीपुरवठा, महसूल, वन या सर्व जागा तातडीने भरण्यात याव्या तसेच गट अ,  गट ब   2027 रिक्त पदांचा समावेश असावा. तांत्रिक संवर्ग ( कृषी/FSO/ अभियांत्रिकी) देखील Objective करण्यात यावी.. महावितरण, महापारेषण, महानिर्मिती रिक्त पदांची पदभरती तत्काळ सुरू करावी.... @EA_OfficialMH @BaliramDoleyINC @GaneshgSpeaks @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
23
37
860
OBJECTIVE 2027 🔥
खालील सर्व गोष्टी बघा आणि सांगा आम्ही अभ्यास का करायचा....? #Objective परीक्षा पद्धती ही अत्यंत्य पारदर्शक आणि गतिमान आहे... याबाबत माननीय मुख्यमंत्री महोदय @Dev_Fadnavis साहेबांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा ही नम्र विनंती. #Mission_objective
1
10
24
579
जे लोक असा गैरसमज पसरवत आहेत की केवळ 'Descriptive Pattern' मुळेच विश्लेषणात्मक क्षमता (Analytical Ability) सिद्ध होते, त्यांना मला स्पष्टपणे सांगायचे आहे की, एमपीएससी राज्यसेवा (MPSC Rajyaseva) परीक्षा ही 'Objective Pattern' नेच व्हायला हवी. कारण यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 'पारदर्शकता' (Transparency) टिकून राहते. उरला प्रश्न अधिकाऱ्यांच्या विश्लेषणात्मक क्षमतेचा (Analytical Ability), तर त्याबाबतची वास्तववादी माहिती देतो, MPSC राज्यसेवा परीक्षेतून निवड झालेल्या अधिकाऱ्यांना 'यशदा' (YASHADA) या अत्यंत प्रतिष्ठित संस्थेत २ वर्षांचे कसून प्रशिक्षण (Training) दिले जाते. या प्रोबेशन कालावधीत अधिकाऱ्यांना विविध विषयांचे सखोल प्रात्यक्षिक प्रशिक्षण मिळते. विशेष म्हणजे, महाराष्ट्र शासन, यशदा आणि 'गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स' (Gokhale Institute of Politics and Economics - 1930) ,जिथे प्रवेश मिळवण्यासाठी देशभरातील विद्यार्थी प्रयत्नशील असतात , यांनी संयुक्तपणे एक विशेष अभ्यासक्रम विकसित केला आहे. या अभ्यासक्रमाचे नाव 'M.A. in Development Administration' असे असून हा २ वर्षांचा आणि ४ सेमिस्टरचा (Semesters) कोर्स आहे. ही संपूर्ण परीक्षा पूर्णपणे Descriptive Pattern नेच घेतली जाते. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी प्रत्येक अधिकाऱ्याला प्रत्येक सेमिस्टरमध्ये किमान 60% गुण मिळवणे अनिवार्य असते. या कोर्समध्ये अधिकाऱ्यांना खालील महत्त्वपूर्ण विषयांचे प्रशिक्षण दिले जाते: 1). Public Administration and Governance 2). Practical Government Training 3). Policy and Development Management 4). Leadership and Decision Making 5). Report Writing and Presentation 6). Expert-led Learning 7). Public Policy 8). Professional Skills 9).Field Exposure 10). Practical Assignment मुख्य म्हणजे, ज्या 'Analytical Ability' बद्दल वारंवार बोलले जाते, ती विश्लेषणात्मक क्षमता या खडतर प्रशिक्षणादरम्यान अत्यंत उत्तम रीतीने विकसित केली जाते. जेव्हा राज्यसेवा उत्तीर्ण झालेल्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षणादरम्यान Comprehensive Professional Training Programme (CPTP) अंतर्गत इतका दर्जेदार आणि सखोल कोर्स मिळतो, तेव्हा परीक्षेतील पारदर्शकता (Transparency) जपण्यासाठी MPSC राज्यसेवा परीक्षा ही Objective Pattern नुसारच आणि तीसुद्धा २०२७ पासून लागू व्हावी, हीच आमची प्रामाणिक आणि न्याय्य मागणी आहे. @GaneshgSpeaks @BaliramDoleyINC @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
6
24
40
1,072
थोड्याच वेळात आपले लाडके युवा आमदार मा. श्री. निरंजन डावखरे साहेब हे, MPSC विद्यार्थ्यांच्या 'ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न २०२७ पासून पुन्हा लागू व्हावा' या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी येथे उपस्थित राहत आहेत. अहिल्या अभ्यासिका ,पुणे Objective 2027 🔥 @niranjandtweets @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @BaliramDoleyINC @EA_OfficialMH @GaneshgSpeaks
4
11
40
728
मा. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना नम्र विनंती महाराष्ट्र सरकारने स्थापनेपासूनच मध्यस्थांचे (दलालांचे) उच्चाटन करण्याचे खूप मोठे आणि कौतुकास्पद काम केले आहे. गैरप्रकार संपवून शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी मिळवून देणे असो किंवा 'MahaDBT' सारखे पोर्टल सुरू करून अनेक क्षेत्रांतील मध्यस्थांना बाहेर काढणे असो, सरकारने नेहमीच चांगले निर्णय घेतले आहेत. त्याचप्रमाणे २०१२ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण यांनी श्री. सुधीर ठाकरे यांची MPSC च्या अध्यक्षपदी निवड केली होती. ठाकरे साहेबांनी MPSC ची परीक्षा वस्तुनिष्ठ (Objective) स्वरूपाची करून परीक्षेत मोठी पारदर्शकता आणली होती. त्यामुळे दिल्लीत जसा UPSC साठी कोचिंग माफिया तयार झाला आहे, तसा कोचिंग माफिया महाराष्ट्रात तयार झाला नाही. पण आता पुन्हा वर्णनात्मक (Descriptive) परीक्षा पद्धत लागू झाल्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची मुले थेट पुस्तकांतून अभ्यास करण्याऐवजी कोचिंग क्लासेसवर अवलंबून राहू लागली आहेत. म्हणूनच, या क्षेत्रातील मध्यस्थांचे उच्चाटन करण्यासाठी आणि MPSC ची परीक्षा पुन्हा पारदर्शक करण्यासाठी ही परीक्षा पुन्हा 'ऑब्जेक्टिव्ह' (Objective) करण्यात यावी, ही मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना नम्र विनंती! @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @BaliramDoleyINC @EA_OfficialMH
4
33
68
2,146
तुम्ही म्हणता सरकारी नोकरी गरिबी हटावचा कार्यक्रम नाही .पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की सरकारी नोकरी हा 'गरीबी हटाओ'चाच कार्यक्रम का ठरू शकत नाही? सरकारने शेतकऱ्यांच्या पोरांच्या फायद्याचा असलेला ऑब्जेक्टिव्ह (वस्तुनिष्ठ) पॅटर्नच आणला पाहिजे! तुम्ही कोचिंग क्लासवाले स्वतःची तुंबडी भरण्यासाठी ज्या MPSC कडे स्वतःची स्वतंत्र इमारतसुद्धा नाही – तिच्याकडे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा हट्ट धरत असाल, तर गरीब विद्यार्थ्यांनी सोप्या अन् पारदर्शक ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नची मागणी का करू नये? आम्ही काय भीक किंवा फुकट नोकरी मागत नाही आहोत! सरकारी नोकरी क्लार्कची असो की Class-1 ची, ती एका गोरगरीब घरातील पोराला खेचून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून बसवण्याची ताकद ठेवते! थोर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर कराड कोर्टात क्लार्क म्हणून राबले, पण त्याच नोकरीच्या जिद्दीवर त्यांनी आपलं कुटुंब सावरून समाज ढवळून काढणारी कामे केली! लोकहितवादी गोपाळ हरी देशमुखांनीसुद्धा आपल्या करिअरची सुरुवात क्लार्क म्हणूनच ठोकली होती! डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वडील सैन्यात होते; त्यांच्या त्या स्थिर उत्पन्नाच्या जीवावरच बाबासाहेब एवढं भव्य शिक्षण घेऊ शकले! आणि जगातील सर्वोत्तम संविधान लिहून आज आम्हाला आमच्या या मागण्यांसाठी आवाज उठवण्याची धगधगती ताकद दिली, ती याच संविधानाने दिली आहे! डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये जसा फक्त कोचिंग क्लासवाल्यांचाच आर्थिक फायदा आणि धंदा दडलाय, तसंच ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नमध्ये गोरगरीब, कष्टकरी पोराला मुख्य प्रवाहात आणून उभं करायची खरी ताकद आहे! OBJECTIVE २०२७ 🔥 @EA_OfficialMH @GaneshgSpeaks @BaliramDoleyINC
2
68
92
1,636
मित्रांनो, १९९२ मध्ये ग्रामपंचायतीला घटनात्मक दर्जा मिळाला आणि 'सरपंच' हे पद बलवान झाले. सरपंचाला गावपातळीवर खूप अधिकार दिले गेले, पण फक्त घटनात्मक दर्जा मिळाला म्हणून आपण सरपंचाची तुलना मुख्यमंत्र्यांशी करू शकत नाही. तसेच, १९२६ मध्ये स्थापन झालेली संघ लोकसेवा आयोग (UPSC) ही एक मोठी संस्था आहे, जिचा मोठा इतिहास आणि मजबूत पाया आहे. तिची तुलना आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाशी (MPSC) करू शकत नाही. MPSC कडे अजून स्वतःची प्रशासकीय इमारत सुद्धा नाही . ज्या अभ्यासाने IAS आणि IPS सारखे मोठे अधिकारी निवडले जातात, तोच अभ्यासक्रम नायब तहसीलदारसारख्या Class-2 च्या पदासाठी असणे योग्य आहे का? MPSC ची क्षमता ओळखा! २०२५ ची राज्यसेवा वर्णनात्मक (Descriptive) परीक्षा रद्द झाली. जाहिरातींमध्ये उपजिल्हाधिकारी (DC) किंवा पोलीस उपअधीक्षक (DYSP) यांसारखी मोठी पदे क्वचितच येतात. अशा वेळी नायब तहसीलदारसारख्या छोट्या पदांसाठी UPSC चा अभ्यासक्रम लागू करणे म्हणजे फक्त गोंधळ निर्माण करणे आहे, हे लक्षात घ्या. OBJECTIVE २०२७ पासून लागू झालेच पाहिजे. @phoenixiasbyNS @GaneshgSpeaks @BaliramDoleyINC @CMOMaharashtra @EA_OfficialMH
1
17
48
1,902